कंधारमध्ये भूमिपुत्रांची ‘इनकमिंग’ चिंतेचा विषय

clipart
clipart
Updated on

कंधार ः कोरोनाच्या पार्शवभूमीवर पुणे-मुंबईसारख्या रेडझोन शहरांसह देशातील इतर शहरांतून हजारो भूमिपुत्र स्वगृही म्हणजे कंधारमध्ये परतले आहेत. तालुक्यातील आजपर्यंतचा अधिकृत आकडा १९ हजारांच्या आसपास असला तरी अनधिकृतपणे अनेकांनी गाव जवळ केल्याने हा आकडा २० हजारांवर सुद्धा असण्याची शक्यता आहे. आरोग्य यंत्रणेणे योग्य वेळी कोरोनासंबंधी उपाययोजना केल्याने कंधारचे ग्रीन झोन अद्यापही अबाधित असून एवढ्या मोठ्या संख्येने भूमिपुत्रांची इनकमिंग मात्र चिंतेचा विषय बनली आहे.

शहर हायवेला जोडलेले नसल्याने येथे उद्योगाला वाव नाही. यामुळे रोजगाराला संधी नाही. बेरोजगार, कामगार, मजूरदार, अल्पभूधारक शेतकऱ्यांना पोटापाण्याचा प्रश्न सतावत असतो. पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेरगावी गेल्याशिवाय पर्याय नसल्याने दतवर्षी हजारोंच्या संख्येने येथील भूमिपुत्र व त्यांचे कुटुंब पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांसह राज्यात व परराज्यातील शहरात स्थलांतरित होतात. मिळेल ते काम करून हे लोक प्रपंच चालवतात.

सर्वांनी घराची वाट धरली
पहिल्या व दुसऱ्या लॉकडाउनची मुदत संपेपर्यंत बाहेरगावी असलेल्या लाखो कामगारांप्रमाणे कंधारच्या भूमिपुत्रांनीही वाट पाहिली. परंतु, लॉकडाउन संपता संपत नसल्याने त्या सर्वांनी घराची वाट धरली. कोणी मिळेल त्या वाहनाने, मागेल तेवढे भाडे देऊन, तर कोणी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून घर गाठत आहेत. शहर व तालुक्यात बाहेरगावांहून आलेल्या भूमिपुत्रांचा आकडा १९ हजारांपर्यंत पोचल्याची नोंद झाली आहे. नोंद न झालेल्यांची संख्याही भरपूर आहे. आरोग्य यंत्रणा वेळीच सतर्क झाल्याने कोरोनाला हद्दपार ठेवण्यात आतापर्यंत तरी यश आले. परंतु, ही स्थिती अशीच राहावी यासाठी कल्पना न देता गावात प्रवेश केलेल्या भूमिपुत्रांचा शोध घेऊन त्यांना होम क्वारंटाइन करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आरोग्य यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेऊन पाऊले उचलण्याची गरज आहे.

१७ हजार ७२० जण होम क्वारंटाइन
बाहेरगावांहून भूमिपुत्रांचे लोंढे तालुक्यात येणे सुरू होताच आरोग्य विभाग सतर्क झाले. येणाऱ्यांची माहिती घेण्यासाठी पथकाची नियुक्ती करून आलेल्यांना होम क्वारंटाइन करणे सुरू करण्यात आले. उस्मानगर प्राथमिक आरोग्य केंद्रात २७ मेपर्यंत २५८९, पेठवडज केंद्रात ३००९, पानशेवडी केंद्रात ५३३२, कुरुळा केंद्रात ४१०१ आणि बारूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात २६८९, अशा एकूण १७ हजार ७२० लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. यातील १३ हजार ३८७ जणांचे होम क्वारंटाइन संपले. अद्याप ४३३३ जण होम क्वारंटाइन आहेत, अशी माहिती आरोग्य सहायक मुश्ताक अली यांनी दिली.

६५२ जणांची केली तपासणी
शहरात बाहेरगावांहून आलेल्या ६५२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या हातावर शिक्के मारून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले. ५६ जणांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले. दहा जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. ते सर्व निगेटिव्ह आल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरविंद फिसके यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com